साखरेला मागणी नसल्याने इथेनॉलनिर्मितीस प्राधान्य - मुरकुटे

गौरव साळुंके
Monday, 26 October 2020

अशोकचा यंदाच्या गळीत हंगामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट व मिरा जाधव तसेच फायनान्स मॅनेजर निलेश व सुप्रिया गाडे यांच्या हस्ते विधीवत गव्हाण पुजन झाले.

श्रीरामपूर ः यंदाच्या हंगामामध्ये साखरेच्या उत्पादनाला फारशी मागणी नसल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे बहुतांशी साखर कारखाने साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादन वाढविणार आहेत.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात व बाहेरचा साडेदहा लाख टन ऊस गळीतासाठी असुन कारखाना आठ लाख टन ऊसाचे गाळप करुन अडीच लाख टन ऊस बाहेरील कारखान्यास देणार आहे, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सांगितले.

अशोकचा यंदाच्या गळीत हंगामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट व मिरा जाधव तसेच फायनान्स मॅनेजर निलेश व सुप्रिया गाडे यांच्या हस्ते विधीवत गव्हाण पुजन झाले.

कामगार सभेचे सचिव अविनाश आपटे, कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, माजी अध्यक्ष कोंडीराम बनकर, रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, सोपान राऊत, कारेगाव भाग कंपनीचे अध्यक्ष बाबासाहेब ढोकचौळे, हिम्मत धुमाळ, काशिनाथ गोराणे, मंजूश्री मुरकुटे, माजी सभापती सुनिता गायकवाड, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते. 

मुरकुटे म्हणाले, की राज्यासह देशभरातील सर्व कारखाने सध्या आर्थिक वाटचालीतून मार्ग काढीत आहेत. सर्वांनाच सातत्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अशोक कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी ठेकेदार, मजूर व संचालक मंडळ एकमताने काम करीत असल्यानेच कारखान्याचा कारभार सुरळीत आहे.

अनेक कारखान्यांमध्ये एकसुत्रता नसल्याने ते ठप्प झाल्याचे दिसतात. काळानुरुप बदल करणे गरजेचे असते. अशोकने बदल करुन योग्य नियोजन केल्यामुळेच आज सुस्थितीतपणे कारखाना सुरु आहेत. त्यात सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी, कामगार आणि व्यवस्थापनाची साथ मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याने भव्य शैक्षणिक संस्था उभारल्या आहे. भविष्यात अशोक कारखाना स्वयंपूर्ण होऊन सभासद, ऊस उत्पादकांना चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आपटे म्हणाले, की कारखाना सध्या अडचणीतून प्रवास करीत असल्याची जाणीव झाली असून त्यातून मार्ग काढला पहिजे, असे आपटे यांनी सांगितले. ऍड. सुभाष चौधरी, श्रीधर कोलते, काकासाहेब शेजुळ उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of demand for sugar, ethanol production is preferred