
-मार्तंड बुचुडे
पारनेर : कमी कालावधीत व नगदी पैसा देणारे पीक तसेच काही दिवसांपासून कांद्याला मिळत असलेला चांगला बाजारभाव यामुळे खरीप व रब्बी हंगामात पारनेर तालुक्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवर कांदा लागवड होण्याची शक्यता वाढली आहे. दोन्ही हंगाम मिळून सध्या ३० हजार हेक्टर लागवड झाली आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरू आहे.