
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही, तर महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाकणार आहे, असा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.