esakal | कुकडीचे पावसाळ्यात उन्हाळी आवर्तन! राष्ट्रवादीची नियत ओळखा
sakal

बोलून बातमी शोधा

राम शिंदे

डिंबे ते माणिकडोह धरणादरम्यानचा बोगदा भाजप सरकारच्या काळात मंजूर झाल्याचे सांगत शिंदे म्हणाले, कुकडी डाव्या कालव्याचा इतिहास तपासून पहा. युतीच्या सरकारने कुकडीचे पाणी श्रीगोंदे, कर्जत करमाळा तालुक्यात आणले.

कुकडीचे पावसाळ्यात उन्हाळी आवर्तन! राष्ट्रवादीची नियत ओळखा

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर सुरू आहे. कुकडी डाव्या कालव्याचे वाटोळे याच राष्ट्रवादीने केल्याचा इतिहास आहे. ज्यावेळी भाजपाचे सरकार आले त्यावेळी कुकडीच्या कामांना गती मिळाली. आताही डिंबे ते माणिकडोह धरणांदरम्यानचा बोगदा आमच्या सरकारच्या मंजूरीनंतरही होत नाही.

राष्ट्रवादीला नगरच्या कुकडीखालील (kukadi canal) शेतीचे वाटोळे करायचे आहे, असा आरोप करीत माजी पालकमंत्री राम शिंदे (Bjp leader Ram shinde) यांनी आगामी काळात यांना हटवून भाजप सत्तेवर आले तरच कुकडीचे पाणी मिळेल असा आशावाद व्यक्त केला. (Due to the NCP leaders, the rotation of the kukadi is delayed)

हेही वाचा: झिंग झिंग झिंगाट...रोहित पवारांचा कोविड सेंटरमध्ये डान्स!

कुकडीच्या पाण्यातील गोंधळाबाबत 'सकाळ'शी बोलताना शिंदे म्हणाले, पाणी आणि शेती याबाबत कळवळा दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रपंच उदध्वस्त करण्याचे धोरण घेतले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची आहे. कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळ्यातील आवर्तन पावसाळ्यात सुरु केले यावरुनच त्यांचे पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा या तालुक्यांबाबतचे प्रेम दिसते. आघाडी सरकारचा या तालुक्यांतील फुललेली शेती उजाड करण्याचा डाव आहे.

डिंबे ते माणिकडोह धरणादरम्यानचा बोगदा भाजप सरकारच्या काळात मंजूर झाल्याचे सांगत शिंदे म्हणाले, कुकडी डाव्या कालव्याचा इतिहास तपासून पहा. युतीच्या सरकारने कुकडीचे पाणी श्रीगोंदे (Shigonda, कर्जत (karjat) करमाळा (karmala) तालुक्यात आणले. त्यानंतर राष्ट्रवादीप्रणित सरकार आले 2014 पर्यंत काहीच प्रगती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुधारित प्रकल्प मान्यता मिळताना जवळपास चार हजार कोटींची मंजुरी दिली. त्यानंतर 216 कोटींच्या डिंबे माणिकडोह बोगद्याला मान्यता दिली. हे सगळे आपण पालकमंत्री असताना झाल्याचा आनंद आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हे सगळे गुंडाळून ठेवले आहे. पुणेकर असणाऱ्या सगळ्याच राष्ट्रवादीचे नेते, आमदार, मंत्री यांना नगर व सोलापुर तालुक्यातील शेतकरी उध्दवस्त करायचा असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारची कुकडीबाबत नियत ठीक नाही

शिंदे म्हणाले, भाजप सरकार व आपण पालकमंत्री होतो. त्यावेळी कुकडीची बैठक कधी हे सांगण्याची गरज भासली नाही. पाण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करण्याचीही वेळ येवू दिली नाही. आता मात्र पावसाळ्यात उन्हाळ्याचे आवर्तन करणाऱ्या सरकारची नियत ठीक नाही हेच दिसून येते. कुकडी खालील शेतकऱ्यांनी या सरकारकडून अपेक्षा ठेवणे आता बंद करून भाजप सरकार पुन्हा आणावे आणि हक्काचे पाणी संघर्ष न करता घ्यावे.

((Due to the NCP leaders, the rotation of the kukadi is delayed)