राशीन परिसरात मुसळधार पावसाचे थैमान; दूध उत्पादनावर परिणाम

दत्ता उकिरडे
Friday, 16 October 2020

पावसामुळे देशमुखवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी, तोरकडवाडीचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून विस्कळीत  झाला आहे.

राशीन (अहमदनगर) : राशीनसह परिसरात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने, पिण्याचे पाणी, मोबाईल सेवा, जनावरांना चारा, अशा समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. 

पावसामुळे देशमुखवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी, तोरकडवाडीचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून विस्कळीत  झाला आहे. येथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कडबाकुट्टी बंद राहिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न आहे. त्याचा दूधउत्पादनावर परिणाम झाला आहे. परिटवाडीच्या बेलोरा ओढ्याला आलेल्या पुरात पुलावरील रस्ता वाहून गेल्याने या गावाचा संपर्क तुटला असून, दळणवळण बंद पडले आहे. 

देशमुखवाडीचे माजी उपसरपंच मालोजी भिताडे म्हणाले, की राशीनच्या वीज वितरण कार्यालयात सध्या बहुतांश कंत्राटी कामगार आहेत. वायरमनची संख्या कमी असून, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने विजेची समस्या सुटत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा.  

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to torrential rains in Rashin area, villagers are facing many problems

Tags
टॉपिकस
Topic Tags: