esakal | इरले व घोंगडी नंतर प्लास्टिक आता पुन्हा इरलेच; हे काय आहे नेमक वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Earle made by tribals for sale in Akole taluka

भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे.

इरले व घोंगडी नंतर प्लास्टिक आता पुन्हा इरलेच; हे काय आहे नेमक वाचा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : भात लावणीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा वापर करीत असत. परंतु आता जमाना बदलला आहे. आधुनिक युगात प्लास्टिकच्या रेडीमेड वस्तू बाजारात आल्याने या वस्तू वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इरले व घोंगडीचा वापर आपोआप कमी झाला आहे. परिणामी इरले, घोंगडी दुर्मीळ झाली आहे. मात्र राजूरच्या बाजारात आज सकाळपासूनच इरले व घोंगड्या विक्रीसाठी आल्या होत्या.

कुमशेत, शिरपुंजे, पेठ्याची वाडी येथील आदिवासी इरले विकताना दिसून आली. इरले 200 रुपये तर घोंगडी ५०० रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत विकली जात होती. पावसापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी भातलावणीची कामे करताना शेतकरी इरले व घोंगडीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असत. शेतकरी स्वत: इरले तयार करीत असत, तर घोंगडी विकत घेतली जात असे. एकदा तयार केलेले इरले किमान पाच सहा वर्षे सहज जात होते. 

घोंगडीसुद्धा अनेक वर्षे टिकत असे. वारा आणि पावसाचा इरले व घोंगडीवर कोणताही परिणाम होत नाही. मुसळधार पावसात घोंगडीमुळे उबदारपणा येत असे. त्यामुळे इरले व घोंगडीलाच शेतकऱ्यांची जास्त पसंती असायची. इरले व घोंगडी वापरल्याने पावसापासून शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होत होता. घोंगडीमुळे तर थंडीपासून शरीराला उबही मिळत होती. सगळ्याच शेतकऱ्यांकडे इरले व घोंगडी असल्याचे पाहावयास मिळत होते. 

जमाना बदलल्याने इरले व घोंगडी दिसणेही दुरापास्त झाले आहे. सध्याच्या युगात प्लास्टिकच्या विविध रेडीमेडी वस्तू बाजारात उपलब्ध होत जुन्या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत. इरले बंविण्य्साठी चार दिवस  आदिवासी जंगलात जाऊन बांबू आणतात व त्यापासून काढ्या काढून त्याचे इरले बनवितात घोंगडी बनवण्यासाठी साधारणपणं दोन व्यक्तींना 10 ते 12 दिवस लागतात. सर्वात प्रथम मेंढीला स्वच्छ धुतल्यावर तिच्या अंगावरील केस कातरून घेतले जातात. हे केस पिंजून त्यापासून लोकर तयार केली जाते.

यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. नंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं, ताणलं जातं. सुताला चांगला पीळ यावा आणि घोंगडी व्यवस्थित विणली जावी म्हणून चिंचोक्यापासून बनवलेली खळ लावली जाते. (रात्रभर भिजवलेले चिंचोके चांगले कुटून घेऊन त्यांच्यापासून खळ बनवली जाते.) घोंगडी विणायला जवळपास दोन ते तीन दिवस लागतात. ही घोंगडी लाकडी हातमागावर विणली जात असल्यामुळं तिची बांधणी अतिशय मजबूत असते आणि ती सहजपणे अनेक वर्षं टिकते.

पूर्वी काळ्या रंगाची घोंगडी अधिक प्रचलित होती. आता बदलत्या काळानुसार त्यात बदल झाला आहे. घोंगडीवर नक्षीकाम असेल तर ग्राहकांकडून पसंती दिली जाते. ग्राहकाच्या मागणीनुसार घोंगडीत बदल झाला असून पांढरी, काळी तसेच जाड लोकर आणून त्यांवर नक्षीकाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर गादी, उशी, लोड, मफलर, जाकीट, कानटोपी, आसनपट्टी, देवादिकांची आसनपट्टी तयार करण्यावर भर दिला जात आहे. शहरवासीयांच्या आवडीनुसार घोंगडी तयार करून द्यावी लागते. साध्या घोंगडीस सुमारे पाच दिवस, जाड घोंगडीस दहा दिवस व नक्षीकाम होणाऱ्या घोंगडी निर्मितीसाठी किमान वीस दिवस लागतात.

आता शेतीची कामे करताना रेनकोट, प्लास्टिक कागद, प्लास्टिक टोप्या, गमबूट आदी रेडीमेड वस्तूंचा वापर करण्यावर आताच शेतकरी अधिक भर देत   आहेत सखुबाई अस्वले - मी कुमशेत वरून  इरले विक्रीसाठी आले मात्र इर्ल्याला ठराविक गिऱ्हाईक आहे .परवडत नाही . तर प्रमोद अवसरकर म्हणाले घोंगडी घेण्याकडे लोकांचा कल असला तरी महागाई मुळे लोक कानाडोळा करतात. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top