मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नाने राहुरी नगरपालिका हद्दीत तीन रोहित्रे

विलास कुलकर्णी
Sunday, 27 December 2020

राहुरी नगरपालिका हद्दीत येवले आखाडा व तनपुरे वाडी येथे कृषी वीज वाहिनीवरील नवीन पाच रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) मंजूर करण्यात आले आहेत.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी नगरपालिका हद्दीत येवले आखाडा व तनपुरे वाडी येथे कृषी वीज वाहिनीवरील नवीन पाच रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) मंजूर करण्यात आले आहेत. तीन दिवसात कामाचा कार्यारंभ आदेश होऊन, आठवडाभरात कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

मंत्री तनपुरे म्हणाले, येवले आखाडा येथील गोसावी नंबर एक, गोसावी नंबर दोन, सांगळे डीपी, गावठाण डीपी तसेच तनपुरे वाडी येथील एक डीपी असे नवीन रोहित्र बसवण्यात येणार आहेत.

या रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने, अनेक वर्षांपासून व्होल्टेज कमी मिळत होते. विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालत नव्हते. रोहित्र, विद्युत पंप वारंवार नादुरुस्त होणे. अशा समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता, नवीन रोहित्र मिळाल्यावर वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने होऊन, शेतकऱ्यांची समस्या दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the efforts of Minister Tanpure three transformer in Rahuri municipal area

Tags
टॉपिकस
Topic Tags: