esakal | तुम्ही पाच प्रवेश करून दिले तर तुमच्या शाळेला किंवा तुम्हाला मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Efforts of teachers to get new admission of students in Akole taluka

ऑनलाईन शिक्षण आणि नवीन प्रवेश यासाठी शिक्षकाची धावपळ चालली असून अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात श्रीरामपूर, ओतूर, संगमनेर, कोपरगाव, सिन्नर या भागातून प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांच्या दारात येऊन 10 रुपयात प्रवेशसोबत वसतिगृहाची सोय.

तुम्ही पाच प्रवेश करून दिले तर तुमच्या शाळेला किंवा तुम्हाला मदत

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : ऑनलाईन शिक्षण आणि नवीन प्रवेश यासाठी शिक्षकाची धावपळ चालली असून अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात श्रीरामपूर, ओतूर, संगमनेर, कोपरगाव, सिन्नर या भागातून प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांच्या दारात येऊन 10 रुपयात प्रवेशसोबत वसतिगृहाची सोय, तर 12वीनंतर इंजियनीयरिंग प्रवेश, कोणताही ट्रेंड मिळेल, असे सांगत प्रवेश प्रक्रिया राबवली जात असली व पालकांना व प्रवेश देणाऱ्यांना काही बक्षिसे व आमिषे दिली जात असली व आपली नोकरी टिकविण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे भविष्य खरच उज्ज्वल होईल.

केवळ भरती करूननंतर येरे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ यायला नको असे जाणकारांचे म्हणणे आहे. संस्थाचालकांनी करोडो रुपये घालून कॉलेज काढले. विद्यार्थी मिळाले नाही तर करणार काय, प्राध्यापकांना पगार कुठून देणार? तेव्हा तुम्ही विद्यार्थी द्या नी पगार घ्या, असाही आतून आवाज व कुजबुज आहे.

अकोले तालुक्यात पर्जन्यवृष्टी थांबायचे नाव घेत नाही. त्यात मुलांना प्रवेश घेण्यासाठी मुले व पालक धडपडत असतानाच त्याच्या या मानसिकतेचा फायदा करून घेत पहाटे, रात्री व दिवस भरही आपल्या फोरव्हील गाड्यांवर शिक्षण आपल्या दारी, ऑनड्युटी असे बोर्ड लावून श्रीरामपूर, कोपरगाव, नाशिक, ओतूर, पुणे, सिन्नर, संगमनेर या भागातून शिक्षक प्राध्यापक येतात व आमच्या कॉलेजला प्रवेश घ्या, तुम्हाला वसतिगृहाची सोय करतो.

प्रवेश फी तुम्हाला जमेल तशी द्या, किंवा शिष्यवृत्तीतून कट करून घेऊ, आमचे कॉलेज कसे चांगले, शिक्षण पूर्ण होताच नोकरी उपलब्ध असे सांगत आदिवासी विधार्थी तरुणांचा प्रवेश निश्चित करण्याचे काम सुरु आहे. 

काही कॉलेजने तर थेट शाळांना, मुख्याध्यापकाने काही ऑफर ही दिल्या आहेत. तुम्ही पाच प्रवेश करून दिले तर तुमच्या शाळेला किंवा तुम्हाला दोन संगणक देऊ तर स्थानिक ठिकाणी आदिवासी विध्यार्थ्यांना कॉलेज असतानाही मात्र आदिवासी विकास विभागाच्या वस्तीगृहात गुणवंत विध्यार्थ्यांना, प्रवेश दिला जात असल्याने इतर कमी मार्क असणाऱ्या मुलामुलींना वसतिगृहाला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्याचे शिक्षण जाऊन येऊन होते. या मानसिकतेचा फायदा घेत काही कॉलेजने तुम्हाला वसतिगृहात प्रवेश व प्रवेश फी नाही किंवा जमेल तशी द्या, सांगत आदिवासी विद्यार्थ्याने प्रवेश करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

अकोले तालुक्यातील विद्यार्थी स्थानिक ठिकाणी कॉलेजची सोया असतानाही वसतिगृह नाही. म्हणून इतर तालुक्यात प्रवेश घेत आहे. तर काही संस्थांमध्ये कॉलेज अनुदानित आहेत.

स्वयं अर्थसाहाय्यता असून आपल्या नावाचे कॉलेज बंद पडू नये म्हणून अनुदानित म्हणून फॉर्म भरून घेणे व ऐनवेळेस अनुदानितच्या जागा संपल्या म्हणून कायम विनाअनूदानीतला (स्वयंअर्थ सहायता) प्रवेश देण्याचा फंडा गेली तीन वर्षांपासून सुरु आहे. फॉर्म व दाखल घेतल्यावर विज्ञान शाखेसाठी चार ते पाच हजार फी वसूल केली जात आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांचे याबाबीकडे दुर्लक्ष्य असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

संपादन : अशोक मुरुमकर