एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही

अशोक मुरुमकर
Wednesday, 21 October 2020

भाजपमध्ये काही दिवसांपासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत शुक्रवारी प्रवेश करणार आहेत.

अहमदनगर : भाजपमध्ये काही दिवसांपासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत शुक्रवारी प्रवेश करणार आहेत. यावर विविध स्तरातून प्रतिक्रीया दिल्या जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते माजी मंत्री राम शिंदे म्हणाले आहेत की, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत भाजप ऐवढी किंमत मिळणार नाही. त्यांना याचा नक्की पश्‍चाताप होईल.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यांना गेल्या विधानसभेत उमेदवारी मिळाली नव्हती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्यात अनेकदा आरोप- प्रत्यारोप सुरु होते. भाजप सोडतानाही खडसे यांनी फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यातील अनेक हेवे- दावे उघड झाले होते. त्यांच्यावर सतत अन्याय होत असल्याचे कार्यकर्तेही म्हणत होते.

काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये नाराज होते. यावर ‘एबीपी माझा’शी बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये किंमत होती. तेवढे किंमत राष्ट्रवादीमध्ये मिळणार नाही. त्यांना राष्ट्रवादीत गेल्यानंतर नक्कीच पश्‍चाताप होईल. त्यांच्याबरोबर जे लोक जात आहेत, अशी वलग्ना केली जात आहे. मला वाटतं लोकमतातला कोणीही प्रतिनिधी त्यांच्याबरोबर जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse will not get a price in NCP