
अर्ज मागे घेण्याची मुदत 21 जानेवारीपर्यंत आहे. 22 रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप होईल.
नगर ः ज्ञानेश्वर साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. हा कारखाना शेवगाव तालुक्यातील घुले बंधूंचे सत्ताकेंद्र आहे.
भेंडे (ता. नेवासे) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी जाहीर केला. त्यानुसार, ज्ञानेश्वर कारखान्यासाठी 30 जानेवारीला मतदान व 31 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
ज्ञानेश्वर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम मागील वर्षीच जाहीर झाला होता. त्यानुसार, उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. मात्र, नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ज्ञानेश्वर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर केला आहे. त्यानुसार, पूर्वीच दाखल झालेल्या उमेदवारीअर्जांची बुधवारी (ता. 6) छाननी होणार आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत 21 जानेवारीपर्यंत आहे. 22 रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप होईल. 30 जानेवारीला मतदान, तर 31 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.