‘नागवडे’, ‘कुकडी’च्या निवडणुका होणार, की मुदतवाढ मिळणार?

election
electionsakal

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : तालुक्यातील शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप कुकडी या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांची मुदत उद्या (ता. ३१) चौथ्या मुदतवाढीनंतर संपत आहे. आता तरी निवडणुका जाहीर होणार, की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याकडे लक्ष आहे. दोन्ही कारखान्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मात्र मिळत नाही.

तालुक्याच्या राजकारणात यंदा कधी नव्हे ते नागवडे कारखान्याच्या निवडणुकीची वाट पाहिली जात आहे. सत्ताधारी नागवडे गटात पडलेल्या फुटीनंतर आरोपांचे मोठे वादळ उठले. ते शमण्यापूर्वीच निवडणुका जाहीर व्हाव्यात, असे विरोधकांना वाटत आहे. मात्र, कोरोना संकटात प्रथम सहा महिने व नंतर तीन टप्प्यांत तीन महिन्यांच्या अंतराने १५ महिन्यांच्या मिळालेल्या मुदतवाढीमुळे निवडणुका सव्वा वर्ष पुढे गेल्या. हीच अवस्था कुकडी कारखाना निवडणुकीबाबतही झाली आहे. अर्थात, कुकडीच्या निवडणुकीत यावेळी राजकीय रस्सीखेच कमी दिसते. त्यामुळे सगळे लक्ष नागवडे कारखाना निवडणुकीवर आहे.

दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळांची मुदत उद्या (मंगळवारी) संपत आहे. त्यानंतर निवडणुका घोषित होणार, की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. राज्यात इतर ठिकाणी निवडणुका होत असताना, तालुक्यातील या कारखान्यांना मात्र मुदतवाढ दिली जात असल्याचे दिसते. याही वेळी तेच होणार असल्याचे खासगीत समजले. मात्र, अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

कदाचित निवडणुका घेण्याचे ठरले तर मतदारयादीकडे लक्ष राहील. कारण, दोन्ही कारखान्यांची सभासदसंख्या पहिल्या यादीत कमी झालेली आहे. त्यात हरकती घेतल्यावर निर्णय येण्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया थांबली. आता ती जेथे थांबली तेथून पुढे सुरू होणार, की नव्याने प्रारूप यादी लागणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

election
टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी रस्त्यावर

नागवडे कारखान्याच्या ‘त्या’ संचालकांचे काय होणार ?

नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशव मगर आणि संचालक अण्णासाहेब शेलार यांना अपात्र ठरविण्याबाबत सभासदांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाली असली, तरी निर्णय झालेला नाही. संचालक मंडळाच्या सलग तीन अथवा त्यापेक्षा जास्त मासिक बैठकांना गैरहजर राहिल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध अपात्रतेचा दावा दाखल आहे.

election
दहावी, बारावी अनुत्तीर्णांची 'परीक्षा'; संभाव्‍य तारखा जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com