esakal | म्हणून केली आहे निळवंडे जलाशयावर विद्युत रोषणाई
sakal

बोलून बातमी शोधा

Electric lighting on the Nilwande reservoir in Akole taluka

निळवंडे जलाशयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अभियंता मनोज डोके यांनी यासाठी नियोजन केले होते.

म्हणून केली आहे निळवंडे जलाशयावर विद्युत रोषणाई

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : निळवंडे जलाशयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अभियंता मनोज डोके यांनी यासाठी नियोजन केले होते.

कोरोनाची पार्श्वभूमी असताना ही विद्युत रोषणाई का करण्यात आली. याचा तपशील समजू शकला नाही. मात्र या प्रकल्पात कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर जोरदार मार्केटिंग केले आहे, असे का करण्यात आले. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
निळवंडे जलाशय ९० टक्के भरले असून या जलाशयातून २००० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे निळवंडे येथील वीज प्रकलपही सुरू झाला आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी या धरणाचे आधी पुनर्वसन मग धरण असा राज्यात पिचड निळवंडे पॅटर्न सुरू झाला. सर्व राज्यात आदर्श पुनर्वसन झालेला हा प्रकल्प असून जलाशय भरण्याची अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर