Srigonde: विजेच्या तारेला हात लागून एकाचा मृत्यू; वीज दुरुस्तीचे सुरु हाेते काम, हात लागला अन्..
वीज दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी करंट सुरू असलेल्या तारेला हात लागल्याने त्यांना धक्का बसला. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
Power line repair site where the man was fatally electrocuted after contact with a live wire.Sakal
श्रीगोंदे : वीज दुरुस्तीचे काम करताना विजेच्या तारेला हात लागून धक्का बसल्याने सलील दस्तगीर शेख (रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदे) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.११) दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील वेळू शिवारात घडली.