
आळेफाटा : अहिल्यानगर- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते १ मे पर्यंत ११ जणांनी आपला जिव गमावला असुन जवळपास ५ ते ७ जण गंभीर जखमी झालेले आहेत.त्यातच या महामार्गाचे काम चालु असल्याने वाहणे अनियंत्रित पणे चालवली जात असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. अहिल्यानगर - कल्याण या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील आळेफाटा पोलीस ठाण्यात अंतर्गत (पेमदरा ते पिंपरी पेंढार)तीस किलोमीटर च्या अंतरात गेल्या पाच महिन्यांत जवळपास १२ अपघात गंभीर स्वरूपाचे झालेले असुन किरकोळ यामध्ये दहा ते पंचवीस स्वरूपाचे अपघात झालेले आहे .यामध्ये ते अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे.