सारा अनर्थ 'एका लग्ना'ने केला..! नगर जिल्ह्यातील ‘या’ गावात अत्यावश्‍यक सेवाही बंद

सुनील गर्जे
Monday, 20 July 2020

सलाबतपूर येथे सोमवारी (ता.  २०) एकाच दिवशी 14 तर परिसरातील दोन गावात प्रत्येकी एक असे 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

नेवासे (अहमदनगर) :  तालुक्यातील सलाबतपूर तेथे सोमवारी (ता.  २०) एकाच दिवशी 14 तर परिसरातील दोन गावात प्रत्येकी एक असे 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सलाबतपूर 'हॉटस्पॉट' जाहीर करून गाव व अत्यावश्यक सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाने नेवासे, सोनई हा पश्चिम भागानंतर आता शिरसगाव, सलाबतपूर या उत्तर भागाकडे शिरकाव केल्याने नेवासे तालुक्याला कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे.

तालुका प्रशासनातर्फे सोमवार सलाबतपूर येथील ६० नागरिकांच्या रॅपिड अँटी टेस्ट घेतल्या. त्यापैकी 14 जणांचा तर परिसरातील गिडेगाव व जळके गावात प्रत्येकी एक असे 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक रणजित डेरे व आरोग्य विभागाचे पथक सलाबतपूर येथे आले.  त्यांनी  बाधितांना रुग्णांना उपचारासाठी नेवासे फाटा येथील विलगिकरण कक्षात हलवले आहे. दरम्यान परिस्थिती पाहता प्रशासनाने सलाबतपूर 'हॉटस्पॉट'  जाहीर केले आहे. येथील अत्यावश्यक सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सहा दिवसांपूर्वी सर्दी, घशात खवखवते म्हणून शिरसगावच्या एका व्यक्तीने सलाबतपूर येथील दोघांनी खाजगी डॉक्टरांकडे प्रथमोपचार घेतले होते. त्या रुग्णासह दोन्हीही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते.

सारा अनर्थ 'एका लग्ना'ने केला..!
सलाबतपूर येथे चारदिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पारपडला. येथे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर येथील पाहुण्यांची उपस्थित होती. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवच्या एक वृद्ध नातेवाईकाचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्यादिवशी नवरीच्या वृद्ध नातेवाईकाचा उपचाराला घेऊन जातांना रस्त्यात मृत्यू झाला.  त्याचा अंत्यविधीही उरकण्यात आळ्मुल्याळे या वृद्धाचा मृत्यूचे कारण मात्र समजले नसले तरी सारा अनर्थ 'एका लग्ना'ने केला..! अशीच चर्चा येथे आहे.
तहसीलदार सुराणा म्हणाले, सलाबतपूर येथे आज 16 बाधित आढळून आले. आणखी नागरिकांच्या रॅपिड अँटी टेस्ट घेतल्याजाणार आहे. सर्वांनी भीती न बाळगता सहकार्य करा. गाव अनिश्चित दिवसांसाठी हॉटस्पॉट जाहीर केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emergency services are also closed in Salabatpur village in Ahmednagar district