esakal | काम देता कोण काम; शहरासह ग्रामीण भागात युवकांच्या अडचणीत भर
sakal

बोलून बातमी शोधा

Emphasis on the plight of youth in rural areas, including cities

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील मजुर, व्यापारी व ग्राहक यांच्या सर्वांची आर्थिक कोंडी झाली आहे.

काम देता कोण काम; शहरासह ग्रामीण भागात युवकांच्या अडचणीत भर

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील मजुर, व्यापारी व ग्राहक यांच्या सर्वांची आर्थिक कोंडी झाली आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत. जे सुरु आहेत. त्यामधे तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक मजुरांच्या हातातील रोजगार हिरावला आहे. हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट होत आहे. यामधुन मार्ग काढण्याचे काम सर्वजण करीत आहेत. युवकांच्या समोर रोजगाराचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

शहरातील कापड, सराफ, फर्नीचर, किराणा व इतर व्यवसायीक कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक लहानमोठे उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे रोजगारासाठी युवक व महिला चाचपडत आहेत. अगदी धुणीभांडी करुन पोट भरणाऱ्या महिलांना आता रोजगार कुठे मिळेल असा प्रश्न आहे. 

व्यापारी वर्गही दुकाने कशी चालवायची या विवंचनेत आहेत. रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारी पातळीवर भरीव प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या सरकारी योजनाही ठप्प झाल्या आहेत. गवंडीकाम करणारे, रोज मजुरी करुन पोट भरणारे आज कामाच्या शोधात आहेत. काम देता का काम अशी हात आता नेमकी कोणाला घालावी असा प्रश्न आहे. 

बाजारपेठ अजुनही पुर्वीसारखा वेग घेताना दिसत नाही. ग्राहकासाठी दुकानदार वाट पहात आहेत. आर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी मार्ग सोधण्याचे काम येथे प्रत्येकजण करीत आहे.

कोरोनामुळे उद्योगहावर अनिष्ठ परीणाम झाला आहे. आता सोशल डिस्टन्स पाळून कोरोनाची लढाई जिकुंन पोटाची लढाई जिंकण्यासाठी येथील प्रत्येकजण संघर्ष करतोय. माणसाचा जिव महत्वाचा आहे. रोजी रोटी पुन्हबा मिळवता येईल. त्यासाठी व्यापारी, लवोकप्रतिनिधी व सर्वांनी एकत्रीत येवुन ही लढाई लढावी लागेल, असे सोन्याचे व्यापारी बाळासाहेब जिरेसाळ यांनी सांगितले.

रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. लहान औद्योगिक वसाहत मजुंरीसाठी सरकारकडे येथील लोकप्रतिनिधी व सत्ताधारी यांनी संघटीतपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. कारेगाव शिवरात औद्योगिक वसाहतीसाठी भुसंपादनाची प्रक्रियेला वेग घेण्याची गरज आहे. शहर व तालुक्यातील युवक व महीलांना रोजगार मिळाला तरच येथील सामान्य माणसाच जिवन समृद्ध होईल, असे सुशिक्षीत बेरोजगार युवक अजित साप्ते यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर