
पाथर्डी : शहरात असलेली अतिक्रमणे पुन्हा एकदा काढून टाकण्याची मोहीम सोमवार (ता. २१) पासून पुन्हा सुरु होणार असून मागील वेळे प्रमाणेच या वेळीही पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग संयुक्तरीत्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करणार आहे. या पूर्वी पालिकेने दोन ते तीन वेळेस अतिक्रमण विरोधात कारवाई करत अनेक रस्त्यांचा श्वास मोकळा केला होता. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा अतिक्रमण धारकांनी डोके वर काढल्याने ही कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.