
अहिल्यानगर : महानगरपालिकेत्या ‘डेंगीमुक्त अहिल्यानगर’ अभियानातून शहरातील साडेतीनशे घरांतील पाणीसाठ्यांमध्ये डेंगीसदृश अळ्या आढळून आल्या आहेत. आतापर्यंत सात हजार घरांना भेटी देवून साडेपाचशे पाणीसाठे नष्ट करण्यात आले आहेत. डेंगीमुक्त अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे, प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात मोफत रक्त, लघवी तपासणी करावी, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला डेंगी होऊ शकतो, हा आजार दिसतो तसा नसून जीव घेणारा आहे, तरी सर्व नगरकरांनी डेंगीमुक्त अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.