काँग्रेसमध्ये इनकमींग सुरु; राहुरीत माजी तालुकाध्यक्षाची राष्ट्रवादीला सोड चिट्टी

विलास कुलकर्णी
Sunday, 3 January 2021

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ यांच्यासह रामदास पाटील विचार मंचच्या राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राहुरी (अहमदनगर) : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ यांच्यासह रामदास पाटील विचार मंचच्या राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

संगमनेर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, मुसळवाडी सोसायटीचे अध्यक्ष अजित धुमाळ, तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर कोळसे, ॲड. पंढरीनाथ पवार यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, सचिन गुजर, करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाळासाहेब आढाव, संजय पोटे, बाबासाहेब धोंडे उपस्थित होते. राहुरी तालुक्यात अस्तित्वहीन झालेल्या काँग्रेस पक्षाला रामदास धुमाळ विचार कार्यकर्त्यांमुळे उभारी मिळाली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entered Congress from NCP in Rahuri taluka