तेव्हा नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर गडाख यांनी काँग्रेसमध्ये केला होता

विनायक दरंदले
Tuesday, 11 August 2020

क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेवासे येथील आमदार व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मनोमन सुखावले आहेत.

सोनई (अहमदनगर) : क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेवासे येथील आमदार व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मनोमन सुखावले आहेत.

2007 मध्ये त्यावेळेचे शिवसेना तालुका अध्यक्ष कारभारी वाखुरे, उपतालुका प्रमुख डॉ. रामनाथ बडे, जेष्ठ संघटक भाऊसाहेब वाघसह तालुक्यातील १०० शिवसेना शाखाप्रमुखांनी गडाखांना साथ म्हणून मुंबईला त्यावेळचे महसूल मंत्री नारायण राणेच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर काँग्रेस पक्षप्रवेश केला होता. तेव्हा गावा- गावातील अनेक शाखा हद्दपार झाल्या होत्या. सध्या सोनई, खरवंडी व चांदे जिल्हा परिषद गटात मोजक्याच शाखा आहेत.

सोनई व परिसरात तर एकही शाखा नाही व फलकही नाही. गडाखांच्या शिवसेना प्रवेक्षानंतर शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मन भरुन आल्याचे सांगितले. तालुक्यासह आता जिल्ह्यात पक्षाची हवा होणार, तालुक्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यां भगव्यामय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मोठे दडपण असतानाही गावागावात फलक जरी हटले असले तरी शिवसैनिक खंबीरपणे उभे होते. गडाखांच्या आगमनाने आता सर्वांना नवसंजीवनी मिळाली, असे उप तालुकाध्यक्ष पंकज लाभाते यांनी सांगितले. 

सोनईतील शिवाजी तरुण मंडळाच्या सदस्यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार घालुन मिठाई वाटप केली. सोशल डिस्टन्सिग ठेवत फटाके वाजविले व जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the entry of Shankarrao Gadakh in Ahmednagar district the number of Shivsena branches will increase