radhakrishna vikhe patil
sakal
पारनेर - तालुक्यातील एकाही शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा राहणार नाही. तसेच पंचनाम्यासाठी पिकाचा फोटो फार्मर आयडी ई पीक पाहाणी याची गरज भासणार त्या अटी शिथिल केल्या आहेत. तसेच ज्या जलजीवन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहे. त्यांना निधी देऊन तातडीने पूर्ण केल्या जातील. कोणत्याही गावाला पाणी व जनावरांना चारा आणि पाणीटंचाई भासणार नाही याची दाखल अधिकाऱ्याने गांभीर्याने घ्यावी, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर येथील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.