
घरकुलांच्या "ब' यादीतील साडेसोळाशे लाभार्थींना घरकुलांचा लाभ द्यायचा आहे.
पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यातील घरकुलांच्या "ब' यादीतील साडेसोळाशे लाभार्थींना घरकुलांचा लाभ द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे,'' असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
पंचायत समितीच्या (स्व.) गोपीनाथ मुंडे सभागृहात महाविकास अभियानाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. गोकुळ दौंड, उपसभापती मनीषा वायकर, रवींद्र वायकर, सोमनाथ खेडकर, संध्या आठरे, एकनाथ आटकर, सुनील परदेशी, सुभाष केकाण, जगदीश पालवे आदी उपस्थित होते. तालुक्यातील "ब' यादीतील लाभार्थींच्या घरकुलास मंजुरी देणे, ज्यांना जागा नाही त्यांना ती उपलब्ध करून देणे व घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
आमदार राजळे यांनी संबंधित सरपंच, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना ही योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. प्रास्ताविक जगदीश पालवे यांनी, तर सूत्रसंचालन प्रशांत तोरवणे यांनी केले. दादासाहेब शेळके यांनी आभार मानले.
संपादन : अशोक मुरुमकर