बीडीओंच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, लोकांकडे पैशाची मागणी

facebook-Hack
facebook-HackEsakal
Updated on

संगमनेर ः संगमनेरातील सामजिक कार्यकर्ते व उद्योजकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट किंवा ते क्लोन करून लोकांकडे पैशाची मागणी केली जात आहे. अगदी मंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही याचा फटका बसला आहे. ही प्रकरणे ताजी असतानाच संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याबाबत तसे घडले आहे. त्यांच्या नावाने बनावट अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे. (Fake Facebook account in the name of Sangamner BDO)

facebook-Hack
दुसऱ्या लाटेत संगमनेरची वाताहत, १७४ गावांत कोरोना संसर्ग

संगमनेरातील एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात व उद्योजक डॉ. संजय मालपाणी यांचे फेसबुक अकाउंट क्लोन करण्यात आले होते. त्यांच्या नावाने व प्रोफाईल फोटोचा वापर करून बनावट खाते उघडले होते. त्यावरुन तातडीची गरज म्हणून काही हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

या बाबत संबंधितांनी पोलिस ठाणे व सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली होती. तसेच आपल्या खात्यांचे प्रोफाईल फोटो बदलले होते. तोच अनुभव गट विकास अधिकारी सुरेश शिंदे यांनाही आला. अज्ञात व्यक्तीने त्यांचा फोटो व नाव असलेले फेसबुक खाते क्लोन केले. त्यावरून त्यांच्या मित्रपरिवाराकडे 10 हजार रुपयांची तातडीची गरज असल्याचे सांगत पैशांची मागणी केली होती.

बीडीओंचे आवाहन

या बाबत त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी शिंदे यांना फोनवरुन विचारणा करीत या प्रकाराची माहिती दिल्यानंतर शिंदे यांनी तातडीने त्यांचे फेसबुक खाते बनावट नावाने सुरू झाल्याचे जाहीर केले. या प्रकाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. तसेच तातडीने जुन्या खात्यावरचा प्रोफाईल फोटो हटवला आहे. सोशल माध्यमाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सुरेश शिंदे यांनी केले आहे.

(Fake Facebook account in the name of Sangamner BDO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com