Ahmednagar Crime : आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार; महावितरणच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा

‘प्रिय ग्राहक, तुमचे वीजबिल अपडेट नसल्याने आज रात्री ९ः३० वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
fraud
fraudSakal
Updated on

Ahmednagar News : ‘प्रिय ग्राहक, तुमचे वीजबिल अपडेट नसल्याने आज रात्री ९ः३० वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा’, असे बनावट संदेश नागरिकांना येत आहेत. या माध्यमातून महावितरणच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा सुरू झाला आहे.

अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फसव्या संदेशाला ग्राहकांनी बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज पाठविण्यात येत आहेत.

एखाद्या ग्राहकाने संपर्क साधला, तर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.

महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टिमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी,

तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रितसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते.

अशी घ्या काळजी

  • महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही

  • महावितरण केवळ VM-MSEDCL/VK-MSEDCL/AM-MSEDCL/JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एसएमएस व व्हॉटस्अॅप मेसेज, इ-मेल पाठविण्यात येत नाहीत.

fraud
Ahmednagar News : कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दर कपातीच्या निषेधार्थ नीलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्‍थळी थापल्या भाकरी
  • बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.

  • कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.

  • ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका. ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार/ एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर किंवा १९३० या क्रमांकावरील नागरिक आर्थिक फसवणूक पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.

वैयक्तिक मोबाईलवरून संपर्क नाही

अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीजबिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुर असलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.