शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल तर साधा अर्ज करील काम तमाम

शेत रस्ता
शेत रस्ताई सकाळ

अहमदनगर ः शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या कोणती असते तर ती जमीन मोजणीची. त्यानंतर प्रश्न भेडसावतो तो शेत रस्त्याचा. शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने चांगले पीकही घेता येत नाही. शेतजमिनीची विभागणी झाल्यानंतर ग्रामीण भागात या समस्या उभ्या राहतात. मोजणीअभावी एकमेकांच्या शेतीत अतिक्रमण केलं जातं. त्याला बांध कोरला किंवा फोडला असं म्हणलं जातं.(Farm Road can be obtained by applying legally)

आपल्या वाट्याला आलेले एकंदर क्षेत्र, त्यातील पोटखराबा वगैरे सगळ्या नोंदी सात-बारा उताऱ्यावर असतात. या जमिनीची मोजणी अत्यंत कमी पैशात करता येते. त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची गरज नसते. किंवा एखाद्या अधिकाऱ्याचे उखळ पांढरे करण्याचीही आवश्यकता नाही. जमीन मोजणी करणाऱ्यासाठी एक अर्ज केला जातो. त्यानुसार अधिकारी शेतात येऊन मोजणी करून देतात. यात दोन प्रकार आहेत, एक तातडीची मोजणी आणि दुसरी यथावकाश करण्याची.

शेत रस्ता
कोरोनाचा कहर : कांताबाईंची कन्या अनिता, नातू बबलूचेही निधन

जमीन मोजणीपेक्षा गंभीर समस्या असते ती शेतरस्त्याची. सध्या महसूल विभागाने गाव रस्ते, शिव रस्ते आणि पाणंद रस्ते मोकळे करून देण्यासाठी अभियान सुरू केले आहे. त्यामुळे बहुतेकांचा प्रश्न मिटला आहे. अतिक्रमण हटवण्यास नकार देणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे.

मुख्य रस्त्यापासून आत शेतामध्ये जायचे असल्यास रस्ता नसतो. तो रस्ता आपल्याला हक्काने मिळवता येतो का, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय असते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. परंतु याविषयी बहुतेकांना माहिती नाही. याविषयीची नेमकी प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊया.

असा करा अर्ज

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवणे हा आपला हक्क आहे. आपली जमीन ज्या क्षेत्रात येते, तेथील महसुली अधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो. त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांच्या नावे अर्ज करावा.

प्रति,

मा. तहसीलदार साहेब,

(जमीन ज्या भागात आहे, तेथील तालुक्याचं नाव)

अर्ज - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करीत आहे.

विषय - शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.

अर्जदाराच्या जमिनीचा तपशील टाकावा -

शेतमालकाचे नाव, गाव, तालुका व जिल्हा नमूद करावा.

गट क्रमांक, एकूण किती क्षेत्र आहे, त्याचा उल्लेख करावा.

आपल्या शेताशेजारील शेतकऱ्यांना नावांचा उल्लेख करावा. थोडक्यात चतुःसीमांचा उल्लेख करावा. नकाशाही जोडावा.

अर्जासाठीचा मायना

मी....

सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण येते. रस्त्याअभावी शेतातील माल घरी आणता येत नाही.

ही अडचण ओळखून कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करावा.

आपला विश्वासू,

अर्जदाराच्या नावाचा उल्लेख करावा.

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडा

अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा. अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांतील (तीन महिन्याच्या आतील) सात-बारा. लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील. अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती.

अर्ज केल्यानंतर नेमके काय होते...

आपण ज्या ठिकाणाहून जाण्यासाठी अर्ज केला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना तहसील कार्यालय नोटीसा काढते. तहसीलदार यांना न्यायालयाचा दर्जा असतो. त्यामुळे त्यांनी दिलेला निकाल हा कोर्टाप्रमाणेच असतो. संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. अर्जदार शेतकऱ्यास खरोखरच गरज आहे का त्याने खोडसाळपणाने अर्ज केला आहे, याची शहानिशा केली जाते. तहसीलदार त्यासाठी स्वतः त्या जागेवर जाऊन पाहणी करतात. त्यांना मागणी योग्य वाटत असेल तर रस्त्याबाबत अर्ज काढतात. लगतच्या बांधावरून रस्ता देताना त्या शेतकऱ्याचे काही नुकसान होते का याचाही विचार होतो. साधारण आठ फूट रूंदीचा रस्ता मंजूर केला जातो. या जागेतून वाहन जाऊ शकते, असा यामागे विचार आहे.

अर्ज नाकारल्यास काय करावे

आपला अर्ज तहसीलदारांनी नाकारला असल्यास वरच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागता येत. मात्र, त्यासाठी 60 दिवसांचा अवधी आहे. उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) किंवा वर्षात दिवाणी न्यायालयात दावा करता येतो. कोर्टात आपणे म्हणणे योग्य रितीने मांडावे. तहसीलदारांनी अर्ज नाकारताना कोणते कारण दिले आहे. त्याचा विचार करून युक्तिवाद करावा.(Farm Road can be obtained by applying legally)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com