
-राजू नरवडे
संगमनेर : खडकाळ माळरान, सातत्याने पाणीटंचाई, त्यातही नैसर्गिक संकटे अशा कठीण परिस्थितीचा सामना करत डोळासणे (ता. संगमनेर) येथील रत्नाकर पोखरकर व प्रकाश पोखरकर बंधुंनी पाण्याची कमतरता असताना देखील जवळपास सात एकर कांद्याच्या पातीतून लखपती बनले आहेत. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.