
राहुरी : सडे येथे शुक्रवारी शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष भानुदास धोंडे (वय ६२, रा. सडे) असे मृताचे नाव आहे. सुभाष धोंडे यांनी काल (शुक्रवारी) सकाळी शेतात फेरफटका मारून नित्यक्रमाची कामे केली. त्यांनी दुपारी तीन वाजता घरातील खोलीत आतून कडी लावून गळफास घेतला.