
पाथर्डी : तालुक्यातील धायतडकवाडी येथील शेतकरी बाबासाहेब नामदेव धायतडक (वय ४६) यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी धायतडक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब बबन गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी) याने दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे नमूद केले आहे.