

Farmer Study Tour
esakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी २० आॅगस्टपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या दौऱ्यामध्ये पाच शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. चीन किंवा युरोपला शेतकऱ्यांच्या प्राधान्यानुसार या अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे.