esakal | कृषी कन्या प्रतिक्षा चौधरी कडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

pratiksha chaudhari

कृषी कन्या प्रतिक्षा चौधरी कडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील कृषी कन्या प्रतिक्षा रमाकांत चौधरी हीने ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 या उपक्रमाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील प्रगतिशील आवळा उत्पादक शेतकरी बाळासाहेब वाळुंज यांच्या औरंगपूर (ता.अकोले) येथील संजीवनी ऑरगॅनिक केंद्रास भेट दिली, तसेच परिसरातील शेतकर्‍यांना चारा प्रक्रिया, माती परीक्षणाचे महत्व, आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची माहिती दिली.

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे ओळखून शेतकरी वाळुंज हे सेंद्रिय शेतीकडे वळाले. या माध्यमातून यश मिळवून त्यांनी आवळा प्रकिया प्रकल्प उभा केला. तब्बल चार एकर शेतीत आवळ्याच्या नरेंद्र 7, कृष्णा, कांचन, चक्या ह्या व्हरायटी लावल्या आहेत. तसेच आंतरपिक म्हणून सिताफळ, आंबा, पेरु लावले आहेत, याबाबत कृषी कन्या प्रतिक्षा चौधरी हीने वाळुंज यांचे कौतुक करुन परिसरातील शेतकर्‍यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे आवाहन करत महत्व पटवून दिले.

शेतकरी वाळुंज यांनी राहुरी विद्यापीठातून फळ प्रक्रिया प्रशिक्षण घेऊन 2007 साली आवळा प्रक्रिया चालु केली. घरघुती साधन सामग्रीतून आज तब्बल 10 लाखाची उलाढाल आहे, त्यात आवळा कॅन्डी, आवळा ज्युस, आवळा चुर्ण, आवळा सुपारी इत्यादी उत्पादने घेत आहेत.

कृषी जागृकता कार्यक्रमांतर्गत यावेळी कृषी कन्या प्रतिक्षा चौधरी यांनी चारा प्रक्रिया, माती परीक्षणाचे महत्व, आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची माहिती वाळुंज व इतर शेतकर्‍यांना दिली. या उपक्रमात कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.एस.पाचपुते व केंद्र प्रमुख डॉ.आर.डी.बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

loading image
go to top