

Pomegranate Farmer Overcomes Loss Replants 80 Trees and Restores Orchard Through Modern Farming and Scientific Management
sakal
कोल्हार : भावाच्या निधनामुळे परिवारावर दुख ओढावले. त्यामुळे स्वकष्टार्जीत डाळिंबाच्या बागेकडे दुर्लक्ष झाले. बागेतील बरीचशी झाडे नैसर्गिक आपत्तीची शिकार ठरली; परंतु त्यामुळे खचून न जाता शरदकिंग वाणाच्या जळालेल्या झाडांच्या जागी तेवढ्याच संख्येच्या भगव्या वाणाची नवीन लागवड केली. झाडांची पुनर्लागवड करून संपूर्ण बागेला जीवदान दिले. राजुरी (ता. राहाता) येथील फार्म डीएसएस ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष डाळिंबरत्न बी. टी. गोरे यांची ही शाश्वत किमया चकित करणारी आहे.