पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित!

कृषी मंत्र्यांच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी घेतला महत्वाचा निर्णय
Puntamba Farmers News
Puntamba Farmers News

पुणतांबा : कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी तीन तास चर्चा झाल्यानंतर धरणं आदोलनाला बसलेल्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांसाठी आपलं आंदोलन स्थिगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्र्यांनी चर्चेचं आश्वासन दिल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. (Farmers agitation in Punatamba A Nagar postponed for two days)

Puntamba Farmers News
मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

चर्चेचा तपशील सांगताना आंदोलक शेतकऱ्यांनी माहिती दिली की, कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की, तुमच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करु. पण सोमवारी चर्चेला वेळ देता येणार नाही. तुमच्या सर्व प्रश्नांची तयारी करायला मला दोन दिवस द्या. नंतर तुम्ही मुंबईला या आपण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून तुमचं जेवढं समाधान होईल ते करण्याचा प्रयत्न करु. पण या बैठकीत आम्ही निर्णय जाहीर करणार नसल्याचं शेतकऱ्यांच्यावतीनं मंत्र्यांना सांगण्यात आलं आहे.

Puntamba Farmers News
नितीन गडकरींचं भाषण ऐकून मलाही कारखाना सुरू करावासा वाटतोय - उद्धव ठाकरे

कारण ग्रामसभेत आम्ही असा निर्णय घेतला होता की, जो काही निर्णय होईल त्यावर पुन्हा ग्रामसभेत कोअर कमिटीसमोर चर्चा होईल त्यानंतर अंतिम निर्णय होईल. तत्पूर्वी आरोग्य मंत्र्यांचं म्हणणं आहे की, मला दोन दिवसाचा वेळ द्या. तुम्ही आंदोलन मागे घेऊ नका पण किमान दोन दिवस ते स्थगित ठेवा. जर ७ तारखेपर्यंत तुमचं मागण्यांबाबत समाधान झालं नाही तर तुम्ही आंदोलन पुढे सुरु ठेऊ शकता, असंही चर्चेदरम्यान ठरल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Puntamba Farmers News
BMC निवडणुकीआधी काँग्रेसची कोर्टात धाव; ५००० कोटी प्रकरणात सेनेला नडणार

दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्या या विनंतीला मान देऊन दोन दिवसांसाठी आपण धरणं आंदोलन स्थगित करत आहोत. त्यानंतर ७ तारखेला आपली जी मिटिंग होईल त्यानंतर जे निर्णय त्यांच्याकडून येतील ते समाधानकारक वाटले तर ग्रामसभेत निर्णय होईल त्याप्रमाणं पुढे जाऊ, असंही यावेळी शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com