esakal | शेतकऱ्यांवर पुन्हा दुसरे संकट; भातावर पडला मावा, तांबेरा रोग
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers in Akole taluka are facing difficulties due to disease on crop due to heavy rains

भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भाताचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांवर पुन्हा दुसरे संकट; भातावर पडला मावा, तांबेरा रोग

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भाताचे नुकसान झाले. भातावर करपा पान कीड, मावा, तांबेरा रोग पडल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतागर्स्त झाले आहेत.

तर भातपिकांचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी केल्याने तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी भेट देऊन या भात पिकांची पाहणी केली. भातावर फवारणी करण्याचे आव्हान केले असले तरी ही भात पिके येतील अशी शाश्वती शेतकऱ्यांना नसल्याने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम भातावर होत आहे. त्यामुळे भात पीक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे भात हे मुख्य पीक आहे. अतिवृष्टीमुळे, भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, मुरशेत, जानेवाडी, कुमशेत, शिरपुंजे परिसरात तांबेरा रोग पडू लागला आहे. तर सततच्या जोरदार पावसाने भात पीक पाण्यात असल्याने हे भात पीक सडु लागले आहे.

कृषी विभागाने पीक पाहणी करून या रोगाचे औषधें उपलब्ध करून द्यावे. काही शेतकऱ्यांची अवनी बाकी आहे. त्यांनाही मदत करण्याची आवश्यकता आहे. जानेवाडी येथील हौशीराम धिंदळे, सोमनाथ धिंदळे आदी दहा शेतकऱ्यांच्या भातपीक तांबेरा रोग पडल्याने ते खराब झाले आहे.भंडारदरा परिसरात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी भेट दिली.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी बिबवे संजय, साहेबराव वायल, कृषी सहायक यशवंत खोकले उपस्थित होते. यावेळी भंडारदरा सरपंच पांडुरंग खाडे, मारुती खाडे, शांताराम खाडे, श्रावण खाडे, भिवा खाडे, मारुती वैराट, दतात्रय खाडे, गंगाराम इदे यांनी भातपिकावर मावा करपा रोग गेल्याचे सांगितले.

कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी मी भाताची पाहणी केली. करपा रोग भातावर पडला असून आम्ही वडगाव मावळ येथील डॉ. काशिद कर यांच्याशी चर्चा करून या भातपिकवर औषधी फवारणी करावयाची आहे ती फवारणी आणून शेतकऱ्यांना दिली जाईल. त्या औषधाचा दोन वेळा फवारणी करून भट खाचरातील पाणी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आव्हान त्यांनी केले.

संपादन : अशोक मुरुमकर