तांब्याभर दूध लवाडलं तर जनावरांला धोपाटतोय... मग एवढं दूध वाया घालवायला आम्हाला...

अशोक मुरुमकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्यात दूध दाराचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यासाठी सध्या विविध संघटांनाचे आंदोलन सुरु आहे.

अहमदनगर : राज्यात दूध दाराचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यासाठी सध्या विविध संघटांनाचे आंदोलन सुरु आहे. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र, त्यातून काहीच निष्पण झाले नव्हते. त्यामुळे हे आंदोलन सुरुच ठेवण्यात आले.

दूध संकलन केंद्रावर न घालता शेतकऱ्यांनी दगडाला दूधाचा अभिषेक घालनू सरकारचा निषेध केला होता. याच आंदोलनाचा भाग म्हणून १ ऑगस्टला दूध खरेदी बंद आंदोलन पुरकरण्यात आले होते. यातच एका तरुण शेतकऱ्याने सरकारच्या धोरणाबाबत संताप व्यक्त करत चक्क दूधाने आंघोळ केली आहे. ही आंघोळ करताना त्याने तिव्र शब्दात सरकारचा निषेध केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.
शनिवारी (ता. १) सकाळी साडेसात वाजलेपासून माकप, भाकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, रिपब्लिकन पक्ष यांनी वेवेगळ्या ठिकाणी दूध आंदोलन सुरू केले आहेत.

यात माकपने दगडाला अभिषेक करत दूध रस्त्यावर ओतले. भाजपने दूध केंद्रावर जाऊन काळ्या फिती लावून दुधाला 30 रुपये भाव देण्याची मागणी करत सरकाचा निषेध केला. माकपचे नेते डॉ. अजित नवले यांनी सुरुवातील आंदोलन सुरु करत दरबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. दगडाला अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर मध्यतरी झालेल्या मंत्रीमंडळातील बैठकीसंदर्भात भूमिका घेऊन आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण शेतकरी म्हणत आहे, अभिषेक तर अभिषेक नंदीलाबी अन्‌ आपल्यालाबी... रोज दुध काढून मेलो... बाहेर दूध आणताये वय... सगळच आणा बाहेरुन... मत मागायलाबी बाहेरचा जा... आता मत मागायला या.... ताब्याभर दूध लवाडलं तर जनावरांला धोपाडतोय... मग एवढे दूध वाया घालवायला आम्हाला तरी गोड वाटतयवय.. सरकार झोपलय... असं म्हणत या शेतकऱ्यांने भावनिक होऊन सरकारच्या धोरणावर भावना व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers are angry with the government for not getting good price for milk