कंपनीकडून कांदा बियाण्यात "लाल-पांढरं", शेतकरी कृषिमंत्र्यांच्या दारात

onion
onionEsakal

श्रीरामपूर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यांमध्ये (onion seed) एका सीड्स कंपनीने मोठी फसवणूक केली आहे. लाल कांद्याचे बियाणे म्हणून पांढऱ्या कांद्याचे बियाणे देवून फसवणूक केली आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी टाकळीभान येथील दत्तात्रय व नारायण चोरमले यांच्यासह परिसरातील जाधव, बाचकर, विटनोर या शेतकऱ्यांनी केली आहे. (Farmers cheated by onion seed company)

मागील वर्षी पाऊस समाधानकारक पडल्याने शेकडो शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र, काही बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना बनावट बियाणे विक्री करून मोठी फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन कांदा पिकाला पाणी दिले. पिकाला खते देण्यावेळी खताची कृत्रिम टंचाई दाखून व्यापाऱ्यांनी चढ्या दराने खते विक्री केली. शेतकऱ्यांनी चढ्या दराने खते खरेदी करून पिकांना दिली. त्यात लाल कांदा म्हणून आणलेले बियाणे पांढरे कांदे निघाले, तरीही शेतकरी वर्गाने कांदा काढणीपर्यंत कांदा सांभाळला.

कांदा काढणी (onion seed) झाल्यावर पांढरा कांदा घेण्यास काही व्यापाऱ्यांनी नकार दर्शविल्याने पिकवलेल्या कांद्याचे काय करायचे असा प्रश्न तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला पडला आहे. मागील वर्षी कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी शोधाशोध करावी लागली. त्यात एका सिड्स कंपनीने कांदा बियाणे उपलब्ध आहेत, अशी माहिती काही दलालांमार्फत ग्रामीण भागात पसरवली.

अडलेल्या शेतकऱ्यांनी सदर कंपनीचे बियाणे खरेदी केले. बियाणे घेवून शेतकऱ्यांनी रोपे टाकून रोपांची लागवड केली. मात्र, पिके वाढीस लागल्यानंतर बियाण्यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बियाणे घेतलेल्या कंपनीला माहिती दिल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना पिकवलेला कांदा खरेदी करण्याचे खोटे आश्वासन दिले.

कांदा तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनीला माल तयार झाल्याचे सांगितले. मात्र, तो माल घेण्यास कंपनीने नकार दर्शविल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी फसवणूक करणारया बनावट सीड्स कंपनीविरोधात कडक कारवाई करण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे (dadaji bhuse) यांनी लक्ष घालण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लाल कांद्याचे बियाणे म्हणून आणलेला सर्व कांदा पांढरा

निघाल्याने बनावट बियाणे कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच बनावट सिड्स कंपन्या सरकारने त्वरित बंद कराव्या. शेतकरी दिवसरात्र कष्ट करतो. त्यांची फसवणूक होत, असेल तर सरकारने त्याकडे लक्ष देवून फसवणूक करणाऱ्या कंपन्याविरोधात कडक कारवाईची मागणी मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपध्यक्ष धनंजय माने यांनी केली आहे.

(Farmers cheated by onion seed company)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com