esakal | कांदा बियाणास सोन्याचा भाव; शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता 
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers cheated as onion seed prices have gone up

कांद्यास सतत वाढत जाणार बाजारभाव, अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम तालुक्यात कांद्याच्या बियाणास व रोपांना मोठी मागणी वाढली आहे.

कांदा बियाणास सोन्याचा भाव; शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता 

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : कांद्यास सतत वाढत जाणार बाजारभाव, अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम तालुक्यात कांद्याच्या बियाणास व रोपांना मोठी मागणी वाढली आहे. परिणामी कांदा बियाणास सोन्याचा भाव आला आहे. तर तालुक्यात कांदा बियाणांच्या व रोपांच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी बोगसबियाणे विकणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची शक्यता आहे. 

पाऊसामुळे कांदा पिकविणाऱ्या अनेक राज्यातील कांदा पीक वाया गेले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढत आहेत. तसेच कांदा बाजार भावाने प्रती किलो थेट शंभरी ओलांडली आहे. पारनेर तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांदा पीक घेतले जाते. 

मात्र यंदा तालुक्यात नुकतीच झालेली अतीवृष्टी व सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक वाया गेले आहे. तसेच कांदा लागवडीसाठी टाकेली कांदा रोपेही जळून गेली आहेत. त्यातच कांद्याला नुकताच शंभर रूपये प्रिती किलोपेक्षा अधिक बाजरभाव मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यात कांदा रोपे व बियाणे मिळेनासे झाले आहे. कांदा बियाणाला सुद्धा सोन्याचा भाव आला आहे. दोन हजार रूपये प्रती किलो असणारा कांदा बियाणाचा बाजारभाव थेट चार हजार किलो झाला आहे. त्याचा परिणाम मात्र अता अनेक ठिकाणी बोगस बियाणांची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

कांद्याच्या बाजार भावात सातत्याने होणारी वाढ तसेच कांदा रोपे सुद्धा खराब झाल्याने कांदा लागवडीवर मर्यादा आल्या आहेत. त्या मुळे बाजार कांदा रोपे व बियाणे मिळत नाहीत त्यांचा मोठ्या प्रमाणात तालुक्यात तुटवडा जाणवत आहे. 

अनेक ठिकाणी कोणत्याही कंपणीचे बियाणे घेऊन अनेक व्यापार किंवा खाजगी लोकही घरचे बियाणे आहे अशी खात्री देऊन बीयाणाची विक्री करत आहेत. तर काही कृषी सेवा केंद्राचे संचालकही अशा प्रकारे कोणत्याही मान्याता प्राप्त कंपणीच्या बियाणा ऐवजी मिळेल त्या कंपण्यांचे बी विकत आहेत. तर काही कृषी सेवा केंद्रांनी मान्यता नसलेल्या कंपणीचे बयाणे सुटे करूण विकण्याचा सपाटा लावला आहे. यातील काही जण तर हे घरचे खात्रीशीर बियाणे आहे असे सांगून विक्री करत आहेत.

त्यामुळे शेतक-यांची मोठी फसवणुक होणार आहे. सध्या तालुक्यात काही लोक गावोगाव फिरून कंपणीचे बीयाणे आहे या नावाखाली चांगल्या पॅकिंग मध्ये अशा प्रकारे कांदा बियाणे विक्री करत आहेत. काही कृषी सेवा केंद्राचे संचालक तसेच खाजगी बियाणे विक्री कराणारे कोणत्याही प्रकारे बियाणे विक्रीचे बील देत नाहीत.त्यामुळे फसवणुक झाली तर पुढे काय करणार असा प्रश्न उपस्ती होत आहे. या कडे कृषी अधिकारी व इतरांनी लक्ष घालावे अशी मागणी जागृक शेतक-यांमधून होत आहे. 

मान्यता नसलेल्या कंपण्यांच्या बियाणे विक्रीबरोबरच मोठ्या प्रमाणात मान्यता नसलेल्या कंपण्याची औषधेही तालुक्यातील अनेक कृषी सेवाकेंद्रतून विकली जात आहेत. मात्र याकडे कोरोनाच्या नावाखाली कोणीच लक्ष द्यायाला तयार नाही. अनेक अधिकारी कार्यालयातच कधीतरी येत आहेत त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image