esakal | पहाटेपासून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्याच विहीरीत
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers commit suicide by jumping into a well due to debt depression

पहाटेपासून घरातील कोणालाही काही न सांगता निघून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या विहीरीत आज दुपारी आढळून आल्याची घटना तालुक्यातील करुले येथे उघडकीला आली.

पहाटेपासून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्याच विहीरीत

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : पहाटेपासून घरातील कोणालाही काही न सांगता निघून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या विहीरीत आज दुपारी आढळून आल्याची घटना तालुक्यातील करुले येथे उघडकीला आली. दिलीप अर्जून कोल्हे ( वय 48 ) रा. करुले, ता. संगमनेर असे त्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, दिलीप कोल्हे यांच्यावर विविध फायनान्स कंपन्यांचे कर्ज होते. नापिक शेती व तोट्यात असलेल्या दूध धंदयामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. तसेच संबंधितांकडून वसूलीसाठी होत असलेल्या तगाद्यामुळे त्यांना काही दिवसांपासून नैराश्य आले होते. यातूनच आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोणालाही काही न सांगता ते घरातून निघून गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत घरी न आल्याने, घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.

या दरम्यान घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्यांच्याच विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच, सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे व पोलिस पाटील अशोक कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप कोल्हे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image