

पारनेर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर असलेल्या जांभूळ ओढ्यात गत आठवड्यात सुपे एमआयडीसीमधील एका कंपनीने आपले रसायनयुक्त पाणी सोडले होते. त्यामुळे ओढ्याचे व त्या परिसरातील विहिरी व कूपनलिका यांचे पाणी खराब झाले. पिकांना पाणी दिल्याने पिके जळाली. विहिरीतील मासेही मृत पावले होते. याबाबत निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जांभूळओढा येथे शेतकऱ्यांनी सुमारे एक तास रास्तारोको केले.