
-महेश माळवे
श्रीरामपूर : शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर झालेली आवक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगाशी येऊ लागली आहे. एकीकडे नोंदणीला दिलेली मुदतवाढ संपली असून, खरेदीची ही मुदत दोन दिवसांत संपणार आहे. असे असताना हजारो शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी ठिकठिकाणच्या केंद्रांवर रांगा लावून बसले आहेत. त्यामुळे खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.