शेतकऱ्याचं कायऽऽऽ हातात पीक येईपर्यंत खरंय, सोन्या सारखं पीक आलं पण...

अशोक मुरुमकर
Thursday, 22 October 2020

शेतकऱ्याचं कायऽऽऽ हातात पीक येईपर्यंत खरंय, सोन्या सारखं पीक आलं पण... पहिल्यांदा पावासामुळे पीकांचे नुकसान झाले.

अहमदनगर : शेतकऱ्याचं कायऽऽऽ हातात पीक येईपर्यंत खरंय, सोन्या सारखं पीक आलं पण... पहिल्यांदा पावासामुळे पीकांचे नुकसान झाले. आता धुक्यामुळे रोग पडेल. हातात आलेले पीक येईल की नाही, काय सांगता येत नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमागे संकटामागून संकटे सुरु आहेत. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेला शेतकरी सावरत असतानाचा आता पुन्हा धुके पडले आहे.  त्यामुळे तूर धोक्यात आली आहे. गुरुवारी (ता. २२) पहाटेपासून मोठ्याप्रमाणात धुके पडल्याने रोग पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात यावर्षी जूनपासूनच चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे तूर, मका, मूग, उडीद, कांदा ही पीक चांगली आली. तूर आता फुलाने बहरत असतानाच आज धुके पडले आहे. त्यामुळे रोग पडण्याची शक्यता आहे. या धुक्यामुळे तूरीवर जाळी तयार होत आहे. जमीनीवर सुद्धा जाळी झाल्याने रोग पडतो असे शेतकरी सांगत आहेत.

गेल्या दोन- चार दिवसात अतिवृष्टी झाल्याने पीकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतातील पीके पाण्यात आहेत. काही ठिकाणी उघडीप दिल्याने पेरणी सुरु केली आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा तर गेला असं समजून उघडीप झाल्यानंतर त्याला पाळी घालून दुसरी पेरणी आहे. मात्र, त्याचा पंचनामा करण्यासाठी नकार दिला जात आहे. याकडे सरकारने गाभीर्याने घेण्याची गरज आहे.
धुके पडल्याने काय नुकसान होऊ शकते.

याबाबत बोलताना शेतकरी हनुमंत मुरुमकर म्हणाले, यावर्षी तूर खूप चांगली आली आहे. वेळीच चांगला पाऊस पडल्याने त्याचे क्षेत्रही वाढले आहे. पण आता धुके पडल्याने रोग पडण्याची शक्यता आहे. या धुक्यामुळे पिकांवर जाळी तयार होत आहे. कांद्याचेही मोठे नुकसान झाले. त्यातच जोरदार पावसामुळे नुकसान झाले आहे. धुई पडल्यानंतर एकतर पाऊस येतो किंवा येत नाही, असा अनुभव आहे. पण धुईमुळे नुकसान होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Maharashtra in trouble again after torrential rains