Success story : शेतकऱ्याची कमाल! केवळ 32 गुंठ्यात 75 टन ऊस

मनोज जोशी
Saturday, 26 December 2020

नांदुरढोक येथील शेतकरी भास्कर भिमराज शिंदे यांनी 32 गुंठे क्षेत्रात को 86032 उस जातीचे 75 मे. टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात 93 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेवुन उच्चांक प्रस्थापीत केला आहे. 

कोपरगाव (अहमदनगर) : सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील वैजापुर तालुक्यातील नांदुरढोक येथील शेतकरी भास्कर भिमराज शिंदे यांनी 32 गुंठे क्षेत्रात को 86032 उस जातीचे 75 मे. टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात 93 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेवुन उच्चांक प्रस्थापीत केला आहे. 

त्यामुळे तालुक्यासह सर्वत्र सदर शेतकरी चर्चेचा विषय ठरले आहे. कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी अभिनंदन केले व इतर उस उत्पादकांनी आपले उत्पादनांत वाढ करावी असे सुचित केले.

शिंदे यांनी कोल्हे कारखान्यांमार्फत कोइमतुर उस संशोधन केंद्रातुन आणलेले को 86032 उस जातीचे पायभूत बेणे घेतले होते. शुध्द व निरोगी बेणे, कंपोस्ट पासुन बनविलेले जिवाणु खत युक्त समृध्द सेंद्रीय खताचा वापर करून कोल्हे कारखान्यांच्या शेतकी व उस विकास खात्याचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळेच विक्रमी उत्पादन घेवु शकलो असे शेतकरी भास्कर शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Nandurdhok took 75 tons of sugarcane in 32 guntas