नोकरी द्या किंवा काम द्या; आपधूपच्या तरूण मंडळाची एकी

मार्तंड बुचुडे 
Sunday, 20 September 2020

म्हसणे फाटा येथे नव्याने ऊभ्या रहात असलेल्या नविन औद्योगिक वसाहत उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत.

पारनेर (अहमदनगर) : म्हसणे फाटा येथे नव्याने ऊभ्या रहात असलेल्या नविन औद्योगिक वसाहत उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना येथे आलेल्या नविन कारखानदार जाणिवपुर्वक काम देत नाहीत. स्थानिकांना टाळले जात आहे. या विरोधात आपधूप येथील स्थानिक भूमिपुत्रांनीगेट बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

याबाबत आपधुप येथील युवकांनी जिल्हाधिकारी, जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे व एमआयडीसी च्या अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हसणे फाटा एमआयडीसी मध्ये जपानी उद्योगासाठी जमीन आधिग्रहण करण्यात येत होत्या त्या वेळी आपधुप ग्रामस्थांनी जमिन न देण्याचा निर्णय घेतला होता त्या साठी शेतक-यांनी मोठा विरोधही केला होता. 

परंतु तात्कालीन प्रांत अधिकारी व औद्योगिक वसाहतीच्या अधिकार्‍यांनी ज्या शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहण होतील त्या शेतक-यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये कायमस्वरुपी काम देण्यात येईल. आपधुप शिवारात येणा-या प्रतेक कंपणीत आपधूप येथील तरूणांना प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु स्थानिकांना फक्त आश्वासनच मिळाले आहे कोणतेही काम किंवा नौकरी मिळाली नाही. त्यामुळे जमिनी देऊन शेतकरी भूमिहीन झाला असून अनेक तरूणांनाही काम नसल्याने ते बेरोजगार झाले आहेत.

गावातील तरुणांनी एकत्र येऊन कंपनी अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष भगवंत गवळी, पुष्पराज गवळी, शरद गवळी, गणेश गवळी, गौरव गवळी, अर्जुन चव्हाण, निलेश गवळी, किशोर गवळी, बापू गवळी, दिपक गवळी, सागर गवळी, शरद पवार उपस्थित उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Parner taluka warned to agitate on Monday