खासगी कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांनी सहकारी कारखान्यालाच ऊस द्यावा

संजय आ. काटे
Friday, 30 October 2020

श्रीगोंदा तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी उसाचे उच्चांकी गाळप होणार आहे. काळजी करू नका; सर्व गाळप आम्हीच करू. शेतकऱ्यांनी घाई न करता ऊस सहकारी साखर कारखान्यांनाच द्यावा.

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी उसाचे उच्चांकी गाळप होणार आहे. काळजी करू नका; सर्व गाळप आम्हीच करू. शेतकऱ्यांनी घाई न करता ऊस सहकारी साखर कारखान्यांनाच द्यावा.

खासगी कारखान्याने उसाचा पहिला हप्ता जाहीर केला असला, तरी "नागवडे' व "कुकडी' सहकारी साखर कारखाने उसाला उच्चांकी भाव देतील, अशी ग्वाही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली. 

आढळगाव येथे एका कार्यक्रमात नागवडे व जगताप एकत्र होते. या वेळी राजेंद्र म्हस्के, टिळक भोस, हौसराव भोस, भगवान महाराज गिरमकर, सुभाष गांधी, सुनील भोस, देवराव वाकडे, देवराव शिंदे, कुमार लोखंडे, श्रीकांत भोस, माऊली उबाळे उपस्थित होते. 
म्हस्के यांनी कारखान्यांच्या दराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर नागवडे म्हणाले, यावर्षी उसाचे विक्रमी गाळप होणार आहे. कारखान्याचे उच्चांकी गाळप झाले तर इतर उपपदार्थ निर्मिती करता येऊ शकते. उसाला चांगला भाव देता येऊ शकतो. तालुक्‍यात दोन वर्षे उसाचे विक्रमी गाळप होणार आहे. शेतकऱ्यांनी घाई न करता ऊस तालुक्‍यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनाच द्यावा. 

जगताप म्हणाले, तालुक्‍यातील खासगी कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केला आहे. नागवडे, कुकडी सहकारी साखर कारखाने यापेक्षा जास्तीचा भाव देतील. सूत्रसंचालन शरद जमदाडे यांनी केले. बंटी उबाळे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers should give sugarcane to cooperative factories only

Tags
टॉपिकस
Topic Tags: