esakal | शेती महामंडळाच्या जमिनीत घातला शेतकऱ्यांनी बळजबरीने नांगर
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers started cultivating the land of Agriculture Corporation in Shrirampur taluka

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन काळात उपासमारीची वेळ आल्याने आम्हाला शेती महामंडळाच्या हरेगाव येथील पडीक जमीनी कसु द्या, अशी मागणी हरेगाव परिसरातील शेती महामंडळ व बेलापूर कंपनीच्या बेरोजगार कामगारांसह भूमिहीन शेतमजूरांनी सरकारकडे केली आहे. हरेगावातील गोरगरीब, बेरोजगार कामगारांनी शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यातील जमीनीत आज नांगर फिरवुन बळजबरीने जमीन कसण्यास प्रारंभ केला.

शेती महामंडळाच्या जमिनीत घातला शेतकऱ्यांनी बळजबरीने नांगर

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन काळात उपासमारीची वेळ आल्याने आम्हाला शेती महामंडळाच्या हरेगाव येथील पडीक जमीनी कसु द्या, अशी मागणी हरेगाव परिसरातील शेती महामंडळ व बेलापूर कंपनीच्या बेरोजगार कामगारांसह भूमिहीन शेतमजूरांनी सरकारकडे केली आहे. हरेगावातील गोरगरीब, बेरोजगार कामगारांनी शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यातील जमीनीत आज नांगर फिरवुन बळजबरीने जमीन कसण्यास प्रारंभ केला.

शेती महामंडळ व बेलापूर साखर कारखाना बंद पडल्यानंतर कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली होती. पुढे मंजूरी करुन पोट भरत असताना कोरोनाचे संकट निर्माण झाले. लॉकडाऊनमुळे हातातील काम थांबले आणि उपासमारीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. तीन महिन्यापासून परिसरातील गोरगरीब, भूमिहीन शेतमजूरांना काम मिळत नसल्याने त्यांनी सरकारसह प्रशासनाकडे निवेदन देवुन शेती महामंडळाची पडीक जमीन कसण्यासाठी मिळण्यासाठी मागणी केली आहे. जमीनी मिळण्यासाठी १९९१ पासून त्याचा लढा सुरु असुन हरेगाव येथील डॉ. आंबेडकर भूमिहीन शेतमजूर संस्थेच्यावतीने महसूल विभागाला अनेकदा निवेदन दिले आहे.
जमीनी मिळण्यासाठी अनेक उपोषणे, मोर्चे झाले. याबाबत सरकार पातळीवर अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याने शेती महामंडळच्या जमीनी बळजबरीने कसण्यासाठी आज प्रारंभ केला. पुढील काळात शेती महामंडळाच्या पडीक जमीनी गरीबांच्या उपजीविकेसाठी कसण्यासाठी द्याव्यात. सरकारला वारंवार निवेदने देऊन शासनस्थरावर ठोस निर्णय होत नसल्याने पोट भरण्यासाठी बळजबरीने जमीन कसणार असल्याचे सांगितले. शेती महामंडळाने निविदा प्रक्रीयाद्वारे देवु केलेली जमीन गरीबांना परवडणारी नसुन भूमिहीन कामगारांचा अंत न पाहता जमीनी कसण्यासाठी द्याव्यात, अशी मागणी दिपक नवगिरे, नंदकुमार वाघमारे, अशोक हिवाळे, सुर्यकांत चाबुकस्वार यांच्यासह परिसरातील गोरगरीब, बेरोजगार कामगारांनी केली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी शेती महामंडळाने जमीनी द्याव्यात
हरेगाव येथील भुमिहीन मजुर जीजाबाईल बनकर म्हणाल्या, कोरोनाच्या कठीण काळात हातातील काम थांबल्यामुळे उपासमारीचा सामना करावा लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सरकारने शेती महामंडळाच्या पडिक जमीनी कसण्यासाठी मोफत द्याव्यात. शेती महामंडळ सध्या निविदा प्रक्रिया द्वारे जमीनी देत असले तरी गरीबांकडे निवेदेची रक्कम नसल्याने आता बळजबरीने जमीनी करण्याची वेळ ओढावली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर

loading image