
राहुरी : सध्या अधून-मधून थंडी, तर मध्येच ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे. सध्या हरभरा पीक हे कीडरोगाच्या प्रादुर्भावाला बळी पडत असल्याचे चित्र आहे. जिल्हाभरात यंदा हरभरा, गहू, ज्वारी ही रब्बी पिके बहरात आलेली आहेत. फुलोरा अवस्थेतील पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे गणित बिघडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.