Sangamner: आम्हाला गोळ्या घाला, मगच पाणी न्या: शेतकऱ्यांचा जलसमाधीचा इशारा, पाईप काढल्याने वातावरण चिघळलं..
शेतकऱ्यांनी कालव्यात थेट पाईप टाकून पाणी घेतले. परंतु दोन दिवसांपूर्वीच हे पाईप फोडून टाकले. त्यानंतर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासन मिळवले.
Agitated farmers threaten suicide over irrigation water removal; tensions rise in the village.Sakal
संगमनेर : तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांवर प्रशासनाने पोलिसी यंत्रणा लावून पाईप काढल्याने वाद निर्माण झाला. या घटनेने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.