
संगमनेर : दूध व ऊस या पिकांबरोबर शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव असलेल्या पिकांची गरज असून, रेशीम उद्योगातून नवीन क्षेत्र खुले होत आहे. हलकी जमीन व कमी पाण्यात तुती लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास शेतकऱ्यांसाठी हा चांगला व्यवसाय ठरणार आहे. या रेशीम उद्योगातून चांगल्या उत्पन्नासह रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.