
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी धुके पडले होते. नगर- सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता.
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी धुके पडले होते. नगर- सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. 8 वाजताही धुके राहिल्यामुळे रस्त्यावर दिवे लाऊन वाहने चालत होती. या धुक्यामुळे शेतकऱ्यांकडून पिकावर रोग पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दिवसांपासून थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण आहे. त्यातच मंगळवारी सकाळी सर्वत्र धुके पडले होते. यामुळे तर, ज्वारी व कांद्यावर रोग पडण्याची शक्यता आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने सर्वत्र पिके चांगली आहेत. त्यातच अवकाळी पावसाने पीकाचे नुकसान झाले. त्यानंतर आता धुके पडले आहे. काही ठिकाणी तुर काढण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी तूरीच्या शेंगा अजून ओल्या आहेत. ज्वारीवरही धुक्यामुळे रोग पडण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.