
अहिल्यानगर : नदीला आलेल्या पुराने घराला अचानक वेढा घातला. घरातील पाच सदस्य पुराच्या पाण्यात अडकले. ही बातमी गावातील तरुणांना कळाली. त्यांनी तत्काळ धाव घेत स्वतःचा जीव धोक्यात घालत पाच जणांना वाचवले. ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावात मंगळवारी (ता.२७) घडली. तरुणांनी वेळीच मदत केल्याने पाच सदस्य वाचले.