नवऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह, तीन दिवसांपासून पत्नी स्वॉब घेण्यासाठी दवाखान्याच्या दारात

अशोक निंबाळकर
Thursday, 9 July 2020

तालुक्यातील एक रूग्ण नगर येथे खाजगी दवाखाण्यात 10 दिवासांपासून उपचार घेत होता. त्याला तीन दिवसांपुर्वी सर्दी व घशाचा त्रास होऊ लागल्याने त्याची खाजगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली असता पॉझटिव्ह आली. त्यानंतर तो जिल्हा रूग्णालयात गेला मात्र त्यास इतर आजार असल्याचे कारण दाखवत जिल्हा रूग्णालयाने त्यास खाजगी दवाखाण्यात कोरोनावर उपचारासाठी पाठविले आहे.

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील एक रूग्ण नगर येथे खाजगी दवाखाण्यात 10 दिवासांपासून उपचार घेत होता. त्याला तीन दिवसांपुर्वी सर्दी व घशाचा त्रास होऊ लागल्याने त्याची खाजगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली असता पॉझटिव्ह आली. त्यानंतर तो जिल्हा रूग्णालयात गेला मात्र त्यास इतर आजार असल्याचे कारण दाखवत जिल्हा रूग्णालयाने त्यास खाजगी दवाखाण्यात कोरोनावर उपचारासाठी पाठविले आहे.
तालुक्यातील अधिकाऱ्यांनी त्याच्या संपर्कातील सर्वांचे स्वॉब तपासणीसाठी घेतले. मात्र त्याच्या बरोबर दवाखाण्यात असलेल्या त्याच्या पत्नीचा स्वॉब घेतला नाही. त्यामुळे मी कोठे जाऊ, असा प्रश्न  उपस्थीत करत ती सध्या खाजगी दवाखाण्याच्या दरवाजात तीन दिवसांपासून बसून आहे. तालुक्यातील संबधीत रूग्ण हा आजारी पडल्याने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला होती. पती कोरोनाबाधीत निघाल्याने व त्यास खाजगी दवाखान्यात भरती केल्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या पत्नीचाही जिल्हा रूग्णालयाने स्त्राव घेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. पारनेर मधील अधिका-यांनीही फक्त तालुक्यातील त्याच्या घरातील लोकांचे व संपर्कातील अशा पाच जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र त्याची पत्नी नगर येथे पतीसोबत होती. तीचा स्त्राव न घेतल्याने ती सध्या नगर येथील तीचा पती उपचार घेत असलेल्या खाजगी दवाखाण्याच्या दरवाजात आहे.
माझीही कोरोनाची तपासणी करावी, अशी विनंती जिल्हा रूग्णालयात संबधीत महिलेने केल्याचेही समजते.
तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या, आज त्या महिलेची हकीगत सकाळी समजल्यानंतर तात्काळा एक रूग्णवाहीका नगरला पाठवली आहे. आता त्या महिलेला पारनेरला अणून तीची तपासणी करून स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. वास्तविक ती नगर येथे होती तीची तेथेच तपासणी होणे गरजेचे होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The female swab from Parner was not taken to check the corona